Special Report Phule Movie | फुले चित्रपटावरुन राजकीय सामना, Sanjay Raut यांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
फुले चित्रपटावरून सुरु झालेला वाद आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांपर्यंत जाऊन पोहोचलाय. ब्राह्मण संघटनांनी या चित्रपटातील दृश्यांवर घेतलेल्या आक्षेपांवर बोट ठेवत सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना मध्यस्थीचं आवाहन करण्यात आलंय. शिवाय 'फुले विरुद्ध फडणवीस' अशा मथळ्याखाली छापण्यात आलेल्या या लेखात प्रकाश आंबेडकरांवरही टीका करण्यात आलीय. शांततेसाठी फडणवीसांना मध्यस्थीचं आवाहन करणाऱ्या या लेखामुळं राजकीय वर्तुळातली शांतता मात्र चांगलीच बिघडलीय. पाहूया, याविषयाची सविस्तर रिपोर्ट.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर बेतलेल्या फुले चित्रपटाच्या प्रोमोतील काही दृश्यांना ब्राह्मण संघटनांनी घेतलेला आक्षेप.. आणि चित्रपटातील काही दृश्यांमध्ये बदल करण्याच्या सेन्सॉर बोर्डानं दिलेल्या सूचना या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या वादाची स्थिती आहे. या वादात आता मुख्यमंत्री फडणवीसांना ओढण्याचा प्रयत्न सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून करण्यात आलाय. 'फुले विरुद्ध फडणवीस' अशा शीर्षकाखाली छापण्यात आलेल्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांना हा वाद शांत करण्याचं आवाहन करण्यात आलंय.